रात्रीच्या वेळेला पतीच्या शोधात ‘ ती ‘ पडली बाहेर मात्र पतीचे चालले होते असे काही : कुठे घडला प्रकार ?

  • by

पतीच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीला पत्नीने आपल्या दिराच्या मदतीने नवऱ्यासोबत रासलीला करताना कारमध्ये रंगेहाथ धरले आणि त्यानंतर त्या पतीची आणि त्याच्या प्रेयसीची जबरदस्त धुलाई केली. नवऱ्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या मुलीसोबत पतीचे अफेअर सुरु असल्याचा संशय त्या पत्नीला होता मात्र ती योग्य वेळेच्या शोधात ती होती . यासाठी तिने दीर आणि सासूला देखील मदतीला घेतले होते. हरियाणातील पानिपत इथे मॉडल टाऊन एरियात मध्यरात्री हे नाट्य रंगले होते .

उपलब्ध माहितीनुसार, पती त्याच्या प्रेमिकेसह कारमधून जात होता मात्र पाठीमागून त्याची पत्नी दिराला मदतीला घेऊन त्याचा पाठलाग करत होती. आपला पाठलाग होत असल्याचे पाहून वाद नको म्हणून पतीने गाडी थांबवली आणि जोरदार भांडणाला सुरुवात झाली. पतीला रंगेहाथ पकडताच हायवेवर मोठा वाद रंगला. वाद वाढतोय हे दिसताच मुलाची आई देखील तिथे आली. रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत हा वाद सुरु होता.

वाद आटोपता येईना म्हणून शेवटी पतीच्या आईने (पत्नीच्या सासूने ) त्याच्या प्रेयसीला तू माझ्या मुलाची पाठ का सोडत नाहीस, असा सवाल केला. यावर प्रेयसीने टाळी एका हाताने वाजत नाही, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवा, तो माझ्यासाठी मरायला तयार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाणार, असे ठाम उत्तर दिल्यानंतर सदर तरुणाची आईदेखील निरुत्तर झाली.

काहीच तोडगा निघत नसल्याने भांडणे आणखी वाढली त्यावेळी तरुणाने त्याच्याच कारच्या काचा तोडायला सुरुवात केली. तोवर लोक बऱ्यापैकी जमले होते त्यातील काही जणांनी ह्या प्रकारची पोलिसांना कल्पना दिली आणि काही मिनिटातच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. पती मध्यरात्र झाली तरीही घरी आला नाही, यामुळे पत्नीने दिराला पतीला फोन करून विचारण्यास सांगितले. यावर पतीने थोड्या वेळात पोहोचतोय असे सांगितल्याने पत्नीला संशय आला.

वेळ न दवडता पत्नीने आपल्या दिराला बोलावून घेतले .पत्नी आणि तिचा दीर पतीला शोधण्यासाठी बाहेर पडले. जीटी रोडवर प्रेयसीची ऍक्टिवा पार्क केलेली दिसली. दीर आणि पत्नी बाजूलाच लपून हा प्रकार पाहत होते . काही वेळातच तिथे त्या महिलेचा पती कार घेऊन हजर झाला त्यात ती तरुणी बसून दुसरीकडे निघाले. दिराने आणि पत्नीने पाठलाग करून कार थांबवली आणि त्यानंतर जोरदार ‘राडा’ सुरु झाला. त्यानंतर सगळीकडून घेरल्यानंतर निराश पतीने आपल्याच कारच्या काचा फोडायला सुरवात केली. पती दारूच्या नशेत होता तसेच पत्नीसोबत नव्हे तर प्रेयसीसोबतच जाण्याचा आग्रह करत होता .

पोलीस आल्यानंतर त्यांनी पुरावा म्हणून ह्या घटनेचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केली . प्रेयसीने व्हिडीओ बनवण्यास विरोध करत पोलिसांशी देखील वाद घालायला सुरुवात केली. कारवाई करा, पण व्हिडीओ बनवू नका, असे तिने सांगितले. नशेत असलेला तरुण कोणाचेच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे पोलीस सर्वांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवण्याचे काम सुरु होते .