.. अन औरंगाबादच्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ यांनी गमावला जीव

शेअर करा

उत्तराखंड येथे उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक टेम्पो ट्रॅव्हलरचा उलटून 100 मीटर दरीत कोसळून अपघात झाला होता त्यामध्ये औरंगाबादच्या डॉक्टर अलका एकबोटे यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झालेले आहे. यामध्ये तब्बल आठ जण औरंगाबाद शहरातील असून बहुतांश व्यक्ती हे डॉक्टर असल्याचे समजते.

सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर इंडो-तिबेट सीमा जवान आणि पोलीस यांनी जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टर अलका एकबोटे बजाज हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. जखमी आठ व्यक्ती औरंगाबाद येथील असून त्यामध्ये अलका यांचे पती डॉक्टर वेंकटेश एकबोटे प्रसुती तज्ञ डॉक्टर अनुप्रिया महर्षी, डॉक्टर उमा पाटील, अर्णव एकबोटे, अमायरा एकबोटे इत्यादी जणांचा समावेश आहे आहे तर इतर व्यक्ती हे पुणे अहमदाबाद आणि दिल्ली येथील रहिवासी असल्याचे समजते.


शेअर करा