काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून देशातील युवकांना रोजगार देण्याचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मित्रांचे विदेशातील भविष्य सुरक्षित करत आहेत असा आरोप केलेला आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष करत असताना केंद्रीय निमलष्करी दलाच्या भरतीसाठी परीक्षा दिलेल्या मात्र अद्याप देखील नियुक्तीपत्र न मिळाल्याने आंदोलन करणाऱ्या काही तरुणांचा एक व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर करत केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, देशातील युवकांना बेरोजगार सोडून मोदींनी आपल्या मित्रांचे भविष्य सुरक्षित केले आहे. देशातील युवकांच्या बाबतीत एवढा भेदभाव का केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारी महागाई आणि रुपयाचे होत असणारे अवमूल्यन तसेच केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणेचा केला जात असलेला गैरवापर या विषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत .2018 मध्ये केंद्रीय निमलष्करी दलाची परीक्षा घेण्यात आली होती मात्र त्यानंतर या तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले नाही त्यासाठी युवकांनी नागपूर ते दिल्ली मोर्चा काढला होता. हा व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केलेला आहे.