‘ दारूच लायसन ‘ पडलं तब्बल ‘ इतक्या ‘ लाखांना, शेतकऱ्याला चक्क लुबाडले

शेअर करा

अनेक जण सध्या खात्रीशीर व्यवसाय म्हणून वाईन शॉप याचा परवाना मिळावा म्हणून प्रयत्नशील असतात. वाईन शॉपचे अनेक वेगवेगळे परवाने आहेत मात्र त्यातील व्यवस्थित माहिती नसल्याने अनेक जणांना सायबर भामट्यांकडून या आधीही गंडा घालण्यात आलेला आहे. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात समोर आली असून जामखेड तालुक्यातील एका व्यक्तीला सुमारे पावणे नऊ लाख रुपयांना फसवण्यात आलेले आहे. आपण उत्पादन शुल्क अधिकारी आहोत असा बहाणा करत या सायबर भामट्याने चक्क डुप्लिकेट लेटरहेड आणि शिक्के याचा वापर करत समोरील व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले होते.

उपलब्ध माहितीनुसार, नानासाहेब आत्माराम खाडे ( राहणार डोळेवाडी तालुका जामखेड ) असे फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तक्रारदार शेतकरी साधारण कुटुंबातील शेतकरी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना तीन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले त्यामध्ये तुम्हाला दारुचे लायसन अर्थात वाईन शॉप परवाना मिळवून देऊ असे सांगण्यात आले. समोरील व्यक्तीने त्यांना आपण चक्क उत्पादनशुल्क विभागातून बोलत आहोत असे सांगत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. सायबर भामटे यांची बोलण्याची पद्धत सरकारी बाबूसारखीच असल्याने खाडे यांचा गैरसमज झाला.

समोरील व्यक्तीने त्यांना व्हाट्सअपवर आणि ईमेलवर चक्क खोटी कागदपत्रे आणि उत्पादन शुल्क विभागाचे लेटरहेड तसेच यासंदर्भातील बनावट शिक्के यांची माहिती दिल्याने समोरील व्यक्ती हा खरोखरच उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आहे असा त्यांचादेखील समज झाला त्यानंतर समोरील भामट्याने त्यांना रजिस्ट्रेशन शुल्क, प्रोसेसिंग फी, सरकारी शुल्क असे सांगत वेगवेगळ्या पद्धतीने सुमारे पावणे नऊ लाख रुपये त्यांच्याकडून हस्तगत केले.

मार्च 2022 नंतर आज-उद्या करत त्यांनी लायसन देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली त्यावेळी नानासाहेब खाडे यांनी त्याला जाब विचारला असता त्याने तीनही फोन बंद करून टाकले. बरेच दिवस नानासाहेब खाडे हे त्या व्यक्तीला शोधत होते मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात जाऊन नानासाहेब खाडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले हे करत आहेत.


शेअर करा