शिवसेनेला मनसेचा मोठा धक्का..’ ह्या ‘ शहरातले सात निष्ठावंत शिवसैनिक मनसेत दाखल

शेअर करा

मनसे आणि शिवसेनेमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरु असतेच मात्र आता मनसेने शिवसेनेचे निष्ठावंत जुने शिवसैनिक आपल्या पक्षात वळवले आहेत. औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. निवडणुका तोंडावर असताना मनसेने मोर्चेबांधणी सुरु केलेली दिसत असून शिवसेना आणि मनसेमध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुकांत तुल्यबळ लढाई होऊ शकते .

चंद्रकांत खैरे यांच्या निष्ठावंत समर्थकांनी आज मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हे प्रवेश झाले. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केल्याने चंद्रकांत खैरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मनसेत प्रवेश केलेले काही शिवसैनिक माजी नगरसेवकही आहेत.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणे तसेच वैयक्तिक पातळीवर मतदान करणारे नागरिक यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मनसेच्या महाअधिवेशनापूर्वी ट्विटरवरुन थेट शिवसैनिकांनाच मनसेत येण्यासाठी आवाहन केले होते .

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल शिवसेना 29 भाजप 22 एमआयएम 25 कॉंग्रेस 10 राष्ट्रवादी 03 बसप 05 रिपब्लिकन पक्ष 01 अपक्ष 18 असे असून जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता.


शेअर करा