मी तर बॉयफ्रेंडसोबत पळून गेले होते तुम्ही मी समजून ‘ अंत्यसंस्कार ‘ कोणावर केले ?

  • by

पोलीस एखाद्या खून झालेल्या आणि अंत्यसंस्कार देखील झालेल्या व्यक्तीच्या मारेकऱ्यांचा शोध घेत असतील आणि जर मयत व्यक्तीच समोर आली आणि सांगितले की मी जिवंत आहे तर काय होईल ? मात्र अशीच एक घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रहिमापूरमध्ये बाकरपूर इथे घडलेली आहे . एखाद्या चित्रपटात शोभावे असे कथानक ह्या बातमीचे आहे. पोलीस ज्या मुलीला मृत समजत होते आणि तिच्या खुनाचा शोध घेत होते तिनेच आता स्वतः जिवंत असल्याचे सांगितल्याने मग डेड बॉडी कुणाची होती ? हा नवीन शोध सुरु झाला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यात एका तरुणीच्या घरच्यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांना एका मुलीचा मृतदेहही सापडला. त्यावेळी या मुलीवर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले. चेहरा पूर्ण विद्रुप केलेला असल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती त्यामुळे ही तीच असावी अशा रीतीने पोलिसांनी नोंद केली आणि त्यानंतर मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना देण्यात आला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. पोलिसांनी त्या मुलीच्या मारेकऱ्यांच्या शोधाला सुरुवात केली मात्र त्या मुलीचे मारेकरी शोधण्यास पोलिसांना यश आले नाही.

दरम्यान ज्या मुलीवर घरच्यांनी मृत झाली असे समजून अंत्यसंस्कार केले त्याच मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ह्या व्हिडिओमध्ये त्या मुलीने, मी माझ्या मर्जीने घरातून पळून जाऊन लग्न केले आहे. माझ्या घरचे मुद्दाम खोटा गुन्हा दाखल करुन याला हत्येचं प्रकरण बनवलं आहे. एवढेच नाही तर तिच्या कुटुंबियांना तिने फोन करुनही जिवंत असल्याचे सांगितले होते तरी त्यांनी गुन्हा दाखल केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांसमोर नवीन गुंता तयार झाला आहे.

सध्या पोलिसांपुढे ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती कोण ? असा प्रश्न समोर आला आहे. आता पुन्हा संपूर्ण प्रकरणाच्या सुरूवातीपासूनच पोलिसांनी याचा नव्याने तपास सुरू केला आहे, अंत्यसंस्कार केलेला मृतदेह कोणाचा होता हे शोधणंही पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. मयत म्हणून ज्या मुलीचा मृतदेह कुटुंबियांना दिला आणि अंत्यसंस्कार देखील झाले ती कोण होती ? . तिचा खुनी शोधण्यास अद्याप देखील पोलिसांना यश का आले नाही ? यामुळे पोलिसांची देखील भूमिका संशयास्पद आहे .