चमचेगिरीला देखील काही मर्यादा ? , निर्मला सीतारामन यांना भाजप नेत्याचा घरचा आहेर

शेअर करा

भाजप नेते अनेकदा पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचे कौतुक करतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचा फोटो लावावा यासाठी प्रयत्नशील असतात. निर्मला सीतारामन यांनी अशाच एका रेशनच्या दुकानावर मोदींचा फोटो का नाही म्हणून चांगलाच वाद निर्माण केलेला होता. भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक खोचक ट्विट केले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे . सुब्रमण्यम स्वामी हे याआधी देखील पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना वेळोवेळी आढळून आलेले आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘ त्या अर्थमंत्री अर्थशास्त्रात निरक्षर आहेत. त्या काहीही बोलू शकतात. भारतातील प्रसारमाध्यमे देखील भित्री आहेत त्यामुळे ती अर्थमंत्र्यांना धारदार प्रश्न विचारू शकत नाही असे म्हटले आहे. गोदी मीडियावर सुब्रमण्यम स्वामी यांनी साधलेला निशाणा अनेकांना पसंतीस पडत असून सत्तेत असल्यानंतर सरकारला प्रश्न विचारणे हे माध्यमांचे काम आहे मात्र गेल्या काही वर्षात माध्यमे आपली जबाबदारी विसरलेले आहेत.

2 सप्टेंबर रोजी देखील सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या तेलंगाना येथील सरकारी रेशनदुकानावर मोदींचा फोटो नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत होत्या त्यावर देखील सुब्रमण्यम स्वामी यांनी चमचेगिरीला देखील काही मर्यादा असतात. तुम्ही प्रभारी मंत्र्याला पत्र लिहून मोदींचा फोटो लावल्याबद्दल तक्रार करू शकत होत्या , ‘ असेदेखील ठणकावले होते.


शेअर करा