फ्लॅटमध्ये कोण येणार आहे बघायला अशा भ्रमात ते होते मात्र झाले ‘ असे ‘ की ? : कुठे घडला प्रकार

शेअर करा

चित्र : सांकेतिक

इंटरनेट तसेच व्हाट्सएप्प आल्यानंतर देहविक्रय करणाऱ्या रॅकेटचे चांगलेच फावले आहे मात्र अशा लोकांवर पोलिसांची देखील करडी नजर असते याचे यांना भानच राहत नाही . पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट संस्कृती असल्याने आपल्यावर कोणाचे लक्ष नाही अशी यांची भावना असते मात्र सोसायटीमधील इतर लोकांना देखील यांचा त्रास होत असतो. पुण्यातील थेरगाव भागातील एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या अशाच एका वेश्याव्यवसायचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपी फरजाना इस्माईल पठाण, अर्चना अजिनाथ कांबळे व दलाल सचिन अशोक खंडागळे यांना अटक करण्यात आली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून थेरगाव पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलींग करित होते. त्यावेळेची थेरगांव येथे एका सोसायटीमध्ये दोन महिला मोबाईलद्वारे चॅटिंग करुन लोकांना वेश्यागमनासाठी मुली पुरवून वेश्याव्यवसाय करित असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टिम तयार करून संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो का, याची खात्री करण्यासाठी डमी गि-हाईक पाठवले.

डमी गिऱ्हाईक पाठवल्यानंतर कात्री पटताच पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत फ्लॅटमध्ये एकूण सहा पीडित महिलांसह दोन आरोपी महिला व एक पुरुष आरोपी आढळून आले. मोबाईलद्वारे चॅटिंग करुन लोकांना वेश्यागमनासाठी मुली पुरवत यांचा वेश्याव्यवसाय सुरु होता . छाप्यामध्ये आरोपी व पीडित महिलांकडून एकूण मोबाईल डमी ग्राहकाकडून घेतलेले चार हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी पीडित सहा महिलांची विचारपूस केली असता त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने व त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेत जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे निष्पन्न झाले.पीडित सहा महिलांना रेस्क्यु फाऊंडेशन, मुंढवा पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. नव नियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्यादिवशी झिरो टॉलरन्स हीच माझी पॉलिसी असणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार वाकड पोलिसांनी ही धडक कारवाई केली.


शेअर करा