तुम रोक ना पाओगे, वह तूफान बन कर आएगा: मोदींना कोणी दिलाय इशारा ?

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असून देशभरातून राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा मिळत असल्या तरी तरुणांचा मोदींवर बेरोजगारीवरून रोष असल्याने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस काँग्रेसकडून व देशभरातल्या तरुणांकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगानं काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘तुम रोक ना पाओगे, वह तूफान बन कर आएगा। आज का बेरोजगार, तुम्हारी सत्ता उड़ा ले जाएगा…’ असं सत्यजित तांबे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

लॉकडाऊननंतर घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारनं दोन महिन्यांपूर्वी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, त्यातून देशातील जनतेला कुठलाही दिलासा मिळाला नाही, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध घटकांशी चर्चा करून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यात देखील हे दावे केवळ तांदूळ आणि डाळ इथपर्यंतच मर्यादित असल्याची पोलखोल झालेली होती.

आर्थिक पॅकेजचा कुठलाही फायदा झाला नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. उलट बेरोजगारी वाढली. केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना कुठलाही दिलासा देऊ शकले नाही, असा आरोपही करण्यात आला होता. त्याच अनुषंगानं सत्यजीत तांबे यांनी आज ट्वीट केलं आहे. ट्वीटसोबत त्यांनी #राष्ट्रीयबेरोजगारदिवस असा हॅशटॅगही शेअर केला आहे.


शेअर करा