‘ जमिनीचा व्यवहार मिटवून टाक ‘ अजित पवार यांच्या आवाजाची नक्कल करून दिला सल्ला : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून ‘जमिनीचा व्यवहार मिटवून टाक ‘असे सांगून दम भरणाऱ्या तोतयास पोलिसांनी अटक केली असून पुणे जिल्ह्यातील दौड इथे हा प्रकार घडला आहे. प्रीतेश शिंदे (वय २५ रा. खडकी, ता. दौन्ड ) याला या प्रकरणात अटक केली आहे. प्रितेश यास न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्याची सुटका करण्यात आली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, प्रशांत सोळस्कर ( रा. खडकी, ता. दौन्ड ) यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती. खडकी इथे एकाच कुटुंबात जागेवरून वाद सुरु आहे . एका गटाची बाजू घेत प्रीतेश शिंदे याने हुबेहूब उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवाज काढत दुसऱ्या व्यक्तीला ‘ खडकी गावात जमिनीवरून वाद घालू नका. आपसात मिटवून टाक. मी दोन दिवसांनी खडकी परिसरात येणार आहे तेव्हा तुझी गाठ घेतो मात्र प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करू नको. जमिनीवरून एकाच कुटूंबात वाद कशाला घालता ?. माझा तुला फोन आला होता हे कोणाला सांगू नको. मी एकांतात तुझी गाठ घेतो ह्या परिसरात मला आय. टी. पार्क सह अन्य काही विकासकामे करायची आहेत ” असे म्हटले.

प्रशांत सोळस्कर यांना हा फोन आला होता मात्र आवाजाची शंका आल्याने त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याशी संपर्क साधून ज्या नम्बरवरून फोन आला होता तो नंबर पोलिसांना दिला. पोलिसांच्या तपासणीत हा कॉल खोटा असल्याचे सिद्ध झाले आणि प्रितेश याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता . प्रीतेश याच्या कारनाम्याची परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे .


शेअर करा