युवकांना समजताच पोलिसांना कळवले आणि वेळेत पोलीस आले म्हणून नाहीतर …. : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

महाराष्ट्र पोलिस आपल्या आदर्श कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. परिस्थिती कितीही खडतर असली तरी आपल्या जबाबदारीचे भान महाराष्ट्रातील पोलीस विसरत नाहीत. असाच एक प्रसंग अकोला जिल्ह्यात घडला आहे . अंदाजे 21 वर्षाची एक युवती अकोला जिल्ह्यातील मलकापूर परिसरात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फिरत असताना काही दारुड्या युवकांनी तिचा पाठलाग सुरू केल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर येताच या कार्यकर्त्यांनी सजगता दर्शवित पोलिसांची मदत घेतली आणि त्या गतिमंद युवतीला रात्री तीन वाजता तिच्या घरी सुखरूप सोडवले.

अकोल्यातील मलकापूर परिसरात शनिवारी रात्री घडलेला हा प्रसंग. एक 21 वर्षाची युवती विमनस्क स्थितीत भटकत होती. याच युवतीच्या मागावर एक मद्यधुंद इसम असल्याची बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांना कळवले. पराग यांनी सजगता दर्शवित खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार खंडेराव यांना मोबाईल वरून माहिती दिली लगेच पोलीस तत्परतेने मलकापुरात पोहोचले.

पोलिसांनी युवतीची विचारपूस केली असता तिने केवळ तिचे नाव सांगितले व गावाचे नावही सांगितले मात्र इतर कोणतीही माहिती तिला देता आली नाही. याच दरम्यान सदर युवती गतिमंद असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिला सर्वोपचार रुग्णालयात नेले. यादरम्यान पोलिसांनी आपले चक्रे फिरवली असता ती युवती बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील असल्याचे समजले .

पोलिसांनी तात्काळ गावात संपर्क करून खात्री केली. आई-वडिलांच्या मायेला पोरकी झालेल्या सदर युवतीचा संभाळ तिचे वयोवृद्ध आजोबा करतात. तिला एक बहिण असून तिचा विवाह झाला आहे ही बातमी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रात्री तीन वाजता पोलिसांनी त्यांच्या वाहनाने सदर युवतीला मनारखेड तिथे पोहोचले. या सर्व प्रकारात पोलीस कर्मचारी गणेश उज्जैनकर, यशोदाबाई पैठणकर, मोईन खान, गजानन मानकर, अमित दारोकार, सागर कनोजिया, सिद्धार्थ शिरसाट, मनीष कनोजिया, हरीश उपाध्याय व मनीष चौधरी यांची सजगता कामाला आली.


शेअर करा