भोऱ्या तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही , चिमुरड्याचा भन्नाट व्हिडीओ पहा

शेअर करा

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर एका चिमुरड्याच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये त्याने लोकशाहीचे कौतुक केलेच आहे असे सांगत लोकशाहीचा आपणही आदर करतो मात्र शिक्षक लोकशाहीचा आदर करत नाही आणि आपल्याला मोक्कार मारतात असे सांगत चिंता व्यक्त केलेली आहे. त्याचे हे भाषण ऐकून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना देखील हसू आवरत नाही.

काय आहे या चिमुरड्याचे भाषण ?

आज लोकशाही दिन आहे. लोकशाही दिवसापासून देशात लोकशाही सुरू झाली. मला लोकशाही फार आवडते. या लोकशाहीमध्ये आपण प्रेमाने राहू शकतो भांडू शकतो मात्र मला तर मोकार खोड्या करायला आवडते . रानात फिरायला अन माकडासारख झाडावर चढायला खूप आवडते पण माझे बाबा मला मारत नाहीत कारण ते लोकशाही मानतात पण माझ्या गावातले बारकाले पोर माझे नाव सरांना सांगतात सर मग लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जशी पायदळी तुडवतात तसे सर मला तसे कधीकधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि मग मला म्हणतात भोऱ्या तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही . तुझ्या तक्रारी फार येतात पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तुम्हाला अख्ख्या तालुक्यात सापडणार नाही एवढे बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो ‘.

हा व्हिडिओ कुठला आहे या संदर्भात सविस्तर माहिती समोर आलेली नसली तरी या चिमुरड्याने आपल्या भाषणातून उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे अत्यंत छान मनोरंजन केलेले आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेक जणांना आवडलेला असून त्याच्या व्हिडिओवर अनेक जण आपली प्रतिक्रिया देत आहेत


शेअर करा