पाकिस्तानी नवरा बायकोला ‘ इंडिया ‘ मुळे मिळेना एकांत , फोटो शेअर करून..

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तान येथील एका जोडप्याची जोरदार चर्चा सुरू असून नवरा-बायकोच्या संसारात आम्हाला प्रायव्हसी मिळत नाही त्यामध्ये ‘ इंडिया ‘ मध्ये येतो असे त्यांनी म्हटलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव इंडिया ठेवलेले असून रात्रीच्या वेळी झोपण्याच्या ठिकाणी आमच्या दोघांच्यामध्ये तो झोपतो त्यामुळे आम्हाला हवी तशी प्रायव्हसी मिळत नाही असे त्यांनी म्हटलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ओमर इसा असे या व्यक्तीचे नाव असून तो गायक म्हणून काम करतो. त्याची बांगलादेश येथील पत्नी शर्मिन बेगम यांनी फेसबुक वर एक फोटो शेअर केलेला असून त्या दोघांच्यामध्ये हा मुलगा झोपलेला आहे. फोटोसोबत त्यांनी जे काही लिहिले आहे त्याची सोशल मीडिया सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली असून मुलाचे नाव इंडिया ठेवल्यावरून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना येत आहेत.

एका पोस्टमध्ये त्यांनी मी आणि माझ्या बेगमने आमच्या पहिल्या बाळाला इब्राहिमला लहान असल्यापासून आमच्याच बेडवर झोपू देण्याची मूर्खचूक केलेली आहे त्याला आता हीच सवय लागलेली असून तो त्याच्या बेडरूममध्ये न झोपता आमच्यामध्ये येऊन झोपतो असे म्हटले आहे .मी पाकिस्तानचा रहिवासी असून माझी पत्नी मूळची बांगलादेश येथील आहे त्यामुळे आम्ही या मुलाला आता इंडिया म्हणतो कारण तो पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या पालकांच्या मधोमध ‘इंडिया ‘ असतो. इंडियामुळे आमच्या आयुष्यात समस्या निर्माण झालेल्या आहेत असे त्याने म्हटलेले आहे .