गुड्डी म्हणाली कधी येतोस डेटवर ? ‘ उतावळ्या ‘ तरुणासाठी तयार होता असा मास्टरप्लॅन

शेअर करा

सोशल मीडियावर ओळख वाढवायची त्यानंतर काही दिवस फोनवर प्रेमाच्या चार गोष्टी करायच्या आणि त्यानंतर भेटायची इच्छा व्यक्त करायची आणि एकदा का तो व्यक्ती भेटायला आला की त्याला बलात्काराच्या किंवा विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवून खंडणी वसूल करायची असे धंदे सध्या सर्रास सुरु असून उत्तर प्रदेशातील हापूर येथे खंडणी उकळणाऱ्या टोळीचा असाच पर्दाफाश करण्यात आला आहे.

‘गुड्डी’ नावाच्या तरुणीनं एका व्यक्तीला सोशल मीडियावर ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर डेटवर बोलावलं.गुड्डीला भेटायचे या आशेने तो तरुण इथे पोहचला. थोडा वेळ दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा झाल्यावर ते एकमेकांच्या जवळ येताच अचानक दोन महिलांसह चार जण आले आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली अडकवू अशी धमकी देत त्याच्याकडून एक लाख रुपये आणि सोन्याची चेन घेतली.

आपल्यासोबत असा प्रकार घडताच सदर तरुणास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले मात्र एक लाख रुपये आणि सोन्याची चेन देऊनही त्यांचे समाधान झाले नाही त्यानंतरही त्यांची पैशांची मागणी वाढली. अखेर ती व्यक्ती पोलिसांकडे गेली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुड्डी आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे तर दोघे जण फरार आहेत. या रॅकेटमध्ये आणखी बरेच जण सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

पोलिसांनी संगीता उर्फ गुड्डी आणि एका साथीदाराला अटक केली आहे तर इतर दोन साथीदार तानिया आणि हरकेश हे दोघे पसार झाले आहेत. आरोपींनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. बलात्काराची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. मात्र, ती न करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी धमकी आरोपींनी दिली होती.


शेअर करा