आरोपींची ‘ अर्धनग्न ‘ धिंड काढताच नागरिकांनी दिल्या महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणा​ : काय आहे प्रकार ?

शेअर करा

महाराष्ट्र पोलिसांच्या या अनोख्या कारवाईची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा आहे .बारमालकावर दहशत बसावी म्हणून बार लुटून ते फरार झाले खरे मात्र पोलिसांच्या सतर्कतेने अवघ्या काही तासात त्यांना जेरबंद करण्यात आले. जेरबंद केल्यानंतर आणले जात असताना पोलिसांची गाडी पंक्चर झाल्याने अर्धनग्न अवस्थेत त्यांना पायी पोलीस स्टेशनला आणण्यात आले. नागपूर येथील जरीपटका पोलिसांच्या ह्या अनोख्या कारवाईच्या पद्धतीची शहरात चांगलीच चर्चा असून आरोपींची अर्धनग्न धिंड पाहण्यास नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. नागरिकांनी यावेळी ‘ महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद’ च्या घोषणाही दिल्या . आशिष प्रेम मसिहा (वय २१, रा. खापरखेडा ), असे अटकेतील लुटारुचे नाव असून त्याचे पाच साथीदार अल्पवयीन आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, जुना जरीपटका बसस्थानक परिसरात श्रेयस संजय पाटील (वय २४ रा. ज्ञानेश्वर सोसायटी, मानकापूर) यांच्या मालकीचे रॉयल बार अँड रेस्टॉरेंट आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास श्रेयस पाटील यांचे वडील संजय पाटील, कर्मचारी गजानन मलिक हे बारमध्ये असताना याचवेळी सहा जण हातात तलवार व शस्त्र घेऊन बारमध्ये घुसले. पाटील व कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. बारमधील साहित्याची तोडफोड करून काऊंटरमधील सात हजार रुपये लुटले व पसार झाले. सीसीटीव्ही घटनेत हा सर्व प्रकार कैद झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे यांच्यासह पोलिसांचा ताफा बारमध्ये पोहोचला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एक आठवड्यापूर्वी लुटारु हे बारमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी बारमध्ये बसून दारु प्यायला लागले. मालकाने नकार दिला. लुटारुंनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर बारमालकाला अद्दल घडविण्यासाठी त्यांनी ही लुटपाट केल्याचे स्पष्ट झाले. अटक व ताब्यात घेण्यात आलेले सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे असून खापरखेडा व यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

बारमध्ये लुटपाट केल्यानंतर लुटारु खापरखेडा येथे गेले. या भागात अर्धनग्न होऊन लुटारु दरोड्याच्या तयारीत होते. याची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांचे पथक तेथे गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने लुटारुंना ताब्यात घेतले. त्यांना घेऊन पोलिस जरीपटक्याकडे येत होते. यशोधरानगर परिसरात आरोपींना घेऊन येणारे वाहन पंक्चर झाले. आरोपी पसार होण्याची शक्यता असल्याने त्यांना तसेच पायी जरीपटका पोलिस स्टेशननमध्ये आणण्यात आले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गुन्हेगारांचा धाक कमी करण्यासह नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी नागपूर पोलिसांकडे गुन्हेगारांची धिंड काढण्यात येत आहे. सुमारे एक गँगस्टर संतोष आंबेकर याची आकावणी चौक ते जिल्हा न्यायालयापर्यंत पायी धिंड काढली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन टोळींची सेंट्रल एव्हेन्यूवरील बजेरिया भागात धिंड काढली होती. नागपूर पोलिसांचा हा ‘धिंड ‘ पॅटर्न नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करत आहेत यात दुमत नाही .


शेअर करा