पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक म्हणून नोंद केलेला ‘ हा ‘ मृत्यू प्रत्यक्षात मात्र होता खून : धक्कादायक सत्य आले बाहेर

शेअर करा

सुरुवातीला पोलिसांनी आकस्मीक म्हणून ह्या मृत्यूची नोंद केली होती मात्र पोस्ट मार्टेममध्ये मात्र तो खून असल्याचे आढळून आले आहे . किरकोळ कारणावरून मुलगा आणि वडील यांच्यात भांडण झाले त्यानंतर त्यांच्यात मारामारीला सुरुवात झाली आणि मुलाने वडिलांचा खून केला,अशी ही धक्कादायक घटना अमरावती इथे घडली आहे. बाप-लेकांनी सोबत मद्यपान केल्यानंतर जेवण केले. जेवण झाल्यानंतर पलंगावर कोण झोपणार ? या वादातून मुलाने वडिलांना जमिनीवर व डोक्यावर पाडले तसेच छातीवर व तोंडावर लाथा मारून संपवल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी कांडलकर प्लॉट येथे घडली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अशाप्रकारे हत्या झाल्याचे स्पष्ट झाले याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस सूत्रानुसार,रामदास सदाशिव पाचकवडे ( राहणार कांडलकर प्लॉट ) असे मृताचे तर भूषण रामदास पाचकवडे (वय ३३ ) असे आरोपीचे नाव आहे. मृताचे बंधू सुनील पाचकवडे ( वय 58 राहणार वल्लभनगर ) यांनी पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती मात्र शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर जखमा आढळून आल्या.

मृताच्या अंगावर जखमा आढळून आल्यानंतर पोलिसांनी भूषणला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली .मृताच्या भावाची तक्रार व चौकशीअंती कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवला व आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अतुल घारपांडे करीत आहेत.

घटना घडली त्यावेळी रामदास पाचकवडे यांची पत्नी बाहेर गेली होती. कामावरून परत आली तेव्हा पती जमिनीवर निपचित पडल्याचे तिला आढळले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे नेले असता मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.


शेअर करा