एक मिठीत तर दुसरी मांडीवर , प्रेमीयुगुल प्रवासातच ‘ आऊट ऑफ कंट्रोल ‘ : व्हिडीओ

शेअर करा

मुंबईच्या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याकारणाने अक्षरशः जीवाची बाजी लावत प्रवास करावा लागतो. प्रवाशांना उभे राहायला देखील अनेकदा गर्दी असल्याने जागा सापडत नाही त्यातून भांडणे देखील होतात. मुंबईतील एका लोकलमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून गर्दीने भरलेल्या या रेल्वेमध्ये दोन कपल चक्क लोकल ट्रेनमध्ये रोमान्स करताना दिसून येत आहे. एका प्रवाशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे

सदर व्हिडिओमध्ये एक कपल एकमेकांच्या मिठीत बसलेले असून एकमेकांचे ते प्रवासादरम्यान चुंबन घेताना दिसून येत आहेत तर दुसरे कपल खिडकीजवळ बसलेले असून विंडो सीटवर मुलाच्या मांडीवर ही मुलगी बसलेली दिसून येत आहे. सदर मुलगी या मुलाच्या मांडीवर बसलेली असून मोबाईल पाहत आहे आणि त्यांच्या आजूबाजूची मुले देखील त्यांच्याच परिचयाचे असल्याचे दिसून येत आहे . लोक आपल्याकडे पाहत आहे याचे देखील त्यांना कुठलेच भान नसल्याचे देखील दिसून येत आहे.

व्हायरल बाबा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून सदर व्हिडिओ सांताक्रुज ते लोअर परेल या स्टेशनदरम्याचा असल्याचे व्हिडिओ ट्विट करणाऱ्या युजरने सांगितलेले आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या जोडप्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी करण्यात येत आहे.


शेअर करा