सुखरूप घरी परतलेल्या पोलीस बापाला पाहून मुलीने हंबरडा फोडला : पहा व्हिडिओ

शेअर करा

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात काही दिवसांपूर्वी दोन गटात तणाव निर्माण झालेला होता. सदर घटनेनंतर पोलीस दलाला देखील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागली. याच दरम्यान पोलीस खात्यात शिपाई पदावर कार्यरत असलेले पवार नावाचे एक कर्मचारी तिथे ड्युटीला होते त्यावेळी त्यांची पंधरा वर्षीय मुलगी आश्लेषा हिने त्यांना फोन करून विचारपूस केलेली होती त्यामध्ये त्यांनी आमची गाडी जमावाने जाळलेली असून तू काळजी करू नको मी सुरक्षित आहे असे म्हटलेले होते. पवार त्यांनतर जेव्हा घरी पोहोचले त्यावेळी त्यांच्या मुलीने अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. एबीपी माझाने याबद्दल वृत्त दिले आहे .

पोलीस बांधवांनी कितीही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम केले तरी अनेकदा नागरिकांकडून त्यांच्या विषयी संतापाच्याच प्रतिक्रिया येत असतात मात्र तरीही पोलिस बांधवांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते. घरी आल्यानंतर पवार यांच्या मुलीने अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून टाहो फोडला. पवार देखील घरी पोहोचल्यानंतर भाऊक झालेले होते. पोलीस बांधवाना किती दबावात काम करावे लागते त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची काय परिस्थिती होत असेल हे देखील या निमित्ताने समोर आलेले आहे .

सिटी चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी असलेले कर्मचारी एस पवार यांची बुधवारी नाईट ड्युटी होती म्हणून ते पोलीस ठाण्यात हजर झालेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास किराडपुरा भागात तणाव निर्माण झाल्याचे समजताच पथकाने तिथे धाव घेतली. सामाजिक उपद्रवमूल्य असलेल्या काही व्यक्तींनी चक्क पोलिसांवरही दगडफेक सुरू केली आणि पोलिसांची देखील काही वाहने पेटवली आणि यात पवार यांची पोलीस व्हॅन जळून खाक झाली.

रात्री टीव्हीवर जेव्हा ही बातमी आली त्यावेळी त्यांची मुलगी आश्लेषा हिने वडिलांना फोन केला त्यावेळी ते सुखरूप असल्याचे समजले मात्र घरी येईपर्यंत संपूर्ण कुटुंब तणावात होते. घराच्या दारावर टकटक वाजली आणि पवार जेव्हा घराच्या आत आले त्यावेळी या मुलीने त्यांच्या गळ्यात पडून टाहो फोडला. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे .


शेअर करा