पुण्यात पुन्हा एकदा हाय प्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश… ‘ ह्या ‘ ठिकाणी झाली कारवाई ?

  • by
चित्र : सांकेतिक

सोशल मीडियावरून एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाखाली हिंजवडी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पुणे शाखा युनिट चार या पथकाने पर्दाफाश केला आहे. चार तरुणींची सुटका करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

गणेश कैलास पवार ( वय २० सध्या राहणार येळवंडे वस्ती हिंजवडी, मुळगाव सताळ पिंपरी तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तसेच त्याच्यासह समीर उर्फ राज उर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख तसेच हिरा ( पूर्ण नाव माहीत नाही ) यांच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट चार्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशान्वये अवैध धंद्याच्या समूळ उच्चाटनासाठी झिरो टॉलरन्स मोहीम कृष्णप्रकाश यांनी हाती घेतली आहे

हिंजवडी फेज 1 मधील लक्ष्मी चौकानगरच्या लगतच्या येळवडे वस्ती येथील हॉटेल ग्रँड मन्नत इथे काही तरुण कडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे अशी माहिती मिळाली. याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. तिथे चार तरुणींना डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले आरोपी पवार हा या हॉटेलचा मॅनेजर असून तो व इतर आरोपी ह्या लॉजमध्ये तरुणींकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते पोलिसांनी या चार तरुणींची सुटका केली. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना रेस्क्यू फाउंडेशन,संरक्षण गृह मोहम्मद वाडी पुणे येथे रवाना करण्यात आले