प्रेम जिंकलं..रुबिनाने धर्मांतर करून शेषकुमार सोबत केले लग्न

शेअर करा

देशातील धार्मिक वातावरण कितीही कलुषित करण्याचा प्रयत्न केला तरी प्रेमी युगुलांना याचे काही घेणे देणे नसते असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यात समोर आलेला असून मुस्लिम धर्मातील रुबीना खान नावाच्या एका तरुणीने आपले प्रेम मिळवण्यासाठी धर्मांतर करून रुबी अवस्थी असे स्वतःचे नाव केले आणि शेषकुमार अवस्थी नावाच्या एका तरुणासोबत प्रेमविवाह केला. कुटुंबीयांच्या विरोधाला रुबीना हिने जुमानता मंदिरात सात फेरे घेऊन लग्न केलेले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांनाही संपूर्ण सुरक्षासह मुलाच्या सासरी धाडण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शिवपुरा येथील रहिवासी असलेली रुबीना खान आणि शेषकुमार अवस्थी यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते . दोघेही वेगवेगळ्या धर्माच्या असल्याकारणाने त्यांच्या या प्रेमप्रकरणाला मोठ्या प्रमाणात विरोध होता त्यामुळे दोघांनीही घरातून जाऊन बंड करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिंदू रितीरिवाजानुसार सात फेरे घेतले आणि त्यानंतर रुबीना खान हिने तिचे रुबीना अवस्थी असे नवीन नाव धारण केले. रुबीना हिच्या आई-वडिलांनी शेषकुमार याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे.

सदर प्रकरण पोलिसात गेले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्यावेळी न्यायालयात रुबीना हिने मी प्रौढ आहे आणि मला माझा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी स्वतः वरून माझा धर्म सोडून हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलेले आहे असे तिने सांगितले. रुबीना हिने हे लग्न आपल्या म्हणण्यानुसार झालेले आहे असे सांगितल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही संपूर्ण सुरक्षासह तिची रवानगी सासरी केलेली आहे सोबतच मुलाच्या घरच्यांनी अखेर विरोध सोडून देऊन आपण मुस्लिम मुलीला घरचे सून म्हणून स्वीकारलेले आहे असे म्हटलेले आहे.


शेअर करा