बडा मासा गळाला , चक्क तहसीलदारासाठीच रचला सापळा अन..

शेअर करा

सरकारी बाबुंना कितीही वेतन आयोग लागू केले तरी लाचखोरी मात्र थांबत नाहीत असेच एक प्रकरण सध्या नाशिकमध्ये समोर आलेले असून एक बडा मासा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत जाळ्यात अडकलेला आहे. नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम असे लाचखोर तहसीलदाराचे नाव असून 15 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे .नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या काही दिवसात कारवाईचा सपाटा लावलेला असून लाचखोर अधिकारी नाशिकमध्ये बदली घेण्यास देखील इच्छुक नसल्याचे गेल्या काही दिवसात दिसून येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नरेश बहिरम असे लाचखोर तहसीलदाराचे नाव असून गौण खनिज प्रकरणातील दंड माफ करण्यासाठी त्यांनी लाच मागितलेली होती . तक्रारदार व्यक्ती यांची नाशिक तालुक्यातील राजुर बहुला इथे जमीन असून जमिनीतील मुरूम प्रकरणात त्यांना दंड ठोठावण्यात आलेला होता. दंडाची रक्कम अत्यंत मोठी असल्याकारणाने जमिनीच्या मालकाने उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील केलेले होते आणि त्यानंतर प्रकरण फेरचौकशीसाठी नरेश बहिरम यांच्याकडे आलेले होते.

सदर प्रकरणात तहसीलदार नरेश बहिरम यांनी तक्रारदार व्यक्ती यांना 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचे तपासात समोर आल्यानंतर नाशिकच्या अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केलेली असून त्यांच्या या कारवाईचे नाशिकमध्ये नागरिकांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या काही दिवसात ज्या काही कारवाया केलेल्या आहेत त्या कौतुकास पात्र असून अशाच पद्धतीने अनेक लाचखोर सरकारी बाबू जेरबंद करण्याची वेळ आलेली आहे.


शेअर करा