‘ दुपटीने परतफेड ‘ दिली नाही म्हणून सावकार घरात घुसला अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ परिसरात समोर आलेली असून मुलीसाठी घेतलेले दोन लाख रुपये दुपटीने परत मागितल्यानंतर ते देण्यास अपयश आले म्हणून एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर 100 जणांकडून अत्याचार घडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे . नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार महिला यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी म्हणून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अविनाश पटेल ( राहणार अमरावती ) यांच्याकडून दोन लाख रुपये घेतलेले होते आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मालकीच्या प्लॉटची इसार चिठ्ठी देखील केलेली होती आणि वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे त्या या रकमेची परतफेड करत होत्या.

काही दिवसानंतर आरोपीची हाव वाढली आणि त्यानंतर त्याने दोन लाखाचे दुप्पट पैसे मागण्यास सुरुवात केले आणि तिथून वादाला सुरुवात झाली. पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास आरोपी व्यक्ती आणि इतर तीन दोन जण महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी आता आम्ही फक्त तीन जर आलेलो आहोत पैसे दिले नाही तर शंभर जण आणून तुझ्यावर अत्याचार करू असे म्हटले. घाबरून गेलेल्या महिलेने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.


शेअर करा