‘ तुझ्या नवऱ्याचे वय तुझ्यापेक्षा बरेच जास्त आहे ‘ प्रियकराचा सल्ला तिने ऐकला नाही म्हणून …

शेअर करा

ब्रेकअप झालेल्या प्रेयसीचे लग्न जुळल्यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणाने हे लग्न तोडण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. ती अखेर ऐकत नसल्याचे पाहून त्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नागपूर शहरातील अंबाझरी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान या तरुणावर पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुभम डोईफोडे ( वय 24 ) असे या तरुणाचे नाव असून तो पाटणसावंगीचा रहिवासी आहे. मूळची सावनेरची आणि सध्या नागपुरात राहणाऱ्या एका 24 वर्षे तरुणीसोबत त्याची 2016 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले मात्र संशय कल्लोळ वाढल्याने या दोघांचे प्रेमसंबंध दोन वर्षापूर्वी संपुष्टात आले तेव्हापासून त्यांच्यात कुठलाही संपर्क नव्हता .

दरम्यान 1 आठवड्यापूर्वी तिची सगाई झाल्याचे कळल्याने शुभम हा अस्वस्थ झाला आणि शनिवारी दुपारी तो नागपूर येथे आला. त्याने तिला फोन करून अंबाझरी तलावाजवळ भेटायला बोलावले. अंबाझरी तलावाच्या काठावरील स्वामी विवेकानंद स्मारक शेजारी दोघे बोलण्यासाठी बसले. शुभम याने तिला जुळलेले लग्न सोडण्यास सांगितले. तुझा होणारा पती हा तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे असे देखील तो म्हणाला.

घरच्या मंडळींनी सर्व विचारविमर्श करून हे लग्न जुळवले आहे आणि आता माझी सगाई देखील झालेली आहे, असे त्या तरुणीने त्याला सांगून आता जर लग्न मोडले तर बदनामी होईल असे सांगून लग्न मोडण्यास नकार दिला. शुभमने तिच्यावर बराच दबाव आणला मात्र ती मानतच नसल्याने तो सैरभैर झाला आणि खिशातले ब्लेड काढून त्याने अचानक स्वतःच्या हाताची नस कापून घेतली त्यामुळे प्रेयसी घाबरली आणि आरडाओरड करून तिने आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. लोकांनी अंबाझरी पोलिसांना फोन करून बोलावले आणि शुभम याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


शेअर करा