अंधभक्तांचे काऊंटडाऊन सुरु..गृहमंत्री अनिल देशमुख आणि महिला पत्रकाराविरुद्ध अश्लील पोस्ट टाकणाऱ्यास पुण्यातून उचलले

शेअर करा

फेसबुक पेजवरून गृहमंत्री अनिल देशमुख आणि महिला पत्रकाराविरुद्ध अश्लील पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी सोमवारी पुणे येथून अटक केली आहे. उस्मानाबाद येथे एका कंपनीत काम करणारा हा तरुण पुणे येथे वास्तव्यास होता. आक्षेपार्ह अशी पोस्ट टाकल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. तो भाजप समर्थक असून मोदी यांचा अंधभक्त असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. ( Offensive Social Media Post On Home Minister Anil Deshmukh Latest News )

लॉकडाऊन कालावधीत सोशल मीडियावर भावना भडकवणारे संदेश टाकणे, खोट्या बातम्या पसरविण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे इंटरनेटवरील अंधभक्त करत असलेल्या उद्योगांकडे देखील पोलिसांचे बारीक लक्ष होते. अशातच आप्पा केसरजवळगेकर या नावाच्या प्रोफाइलवरून गृहमंत्री अनिल देशमुख आणि एका वृत्त वाहिनीच्या महिला प्रतिनिधी विरुद्ध अश्लील पोस्ट टाकण्यात आल्याचे आढळून आले त्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पोलिसांचा तपास सुरू असतानाच ही पोस्ट टाकणारा तरुण नवी मुंबई आणि पुणे परिसरात असल्याची माहीती गुन्हे शाखा युनिट ६ चे सहायक निरिक्षक अनिल गायकवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शर्मिला सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे या तरुणाला पुण्याच्या चिखलीतून अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


शेअर करा