सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू असून चेन्नई येथील हे प्रकरण आहे. चेन्नई येथील मोहम्मद इद्रीस नावाचा व्यक्ती फार्मसी क्षेत्रात काम करतो त्याने त्याच्या मित्राला सहज म्हणून दोन हजार रुपये शनिवारी पाठवले मात्र त्यानंतर अचानकपणे त्याच्या बँक खात्यात कोट्यावधी रुपये जमा झाले . मोहम्मद याला बँकेचा मेसेज आल्यानंतर तो गडबडून गेला मात्र अवघ्या काही मिनिटात त्याचे खाते फ्रीज देखील करण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार , शनिवारी ही घटना घडलेली असून मोहम्मद इद्रीस या तीस वर्षाच्या तरुणाचे कोटक महिंद्रा बँकेत खाते आहे. शनिवारी सकाळी मोहम्मद याने त्याच्या एका मित्राला दोन हजार रुपये पाठवले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात बँकेकडून त्याला मेसेज आला त्यामध्ये तुमच्या बँक खात्यात 753.48 कोटी रुपये जमा झाल्याचा त्यात उल्लेख होता.
मेसेज वाचल्यानंतर मोहम्मद यांना आनंदाचा सुखद धक्का बसला आणि गडबडीत तो बँकेच्या शाखेत पोहोचला . बँक अधिकाऱ्यांनी खात्याचा तपशील घेतला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्याचे खाते फ्रिज करण्यात आले. तामिळनाडूच्या तिरुनवेली येथील मोहम्मद हा रहिवासी असून कामानिमित्त चेन्नई इथे राहतो. बँक अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याचे कबुली दिलेली असून लवकरात लवकर आम्ही मोहम्मद इद्रीस यांचे खाते पुन्हा पूर्ववत करू असे सांगण्यात आलेले आहे.