बुरखाधारी महिलेसोबत फक्त बोलला म्हणून तरुणाचे भिंगारहून अपहरण

शेअर करा

नगर शहराजवळ भिंगार इथे एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून केवळ एका बुरखाधारी महिलेसोबत बोलल्याचा राग आला म्हणून एका तरुणाचे अपहरण करण्याचा प्रकार भिंगार इथे समोर आलेला आहे . आठ तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी सुपा इथे आरोपींचे वाहन डवत तरुणाची त्यातून सुटका केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , महेश अशोक गोराडे ( वय 26 वर्ष राहणार माधवबाग भिंगार ) असे अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तब्बल 15 जणांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी व्यक्ती यांच्या कुटुंबियांचा केटरिंगचा व्यवसाय असून रविवारी संध्याकाळी महेश भिंगार येथील पंचशील कमानीजवळ उभा होता त्यावेळी तिथे एक बुरखाधारी महिला आली आणि तिने त्याच्याशी बोलण्यास सुरू केले. तक्रारदार व्यक्ती यांनी मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगितल्यानंतर त्या महिलेने मी तुमच्याकडे केटरिंगच्या कामासाठी यायचे यासंदर्भात माहिती दिली म्हणून तो महिलेसोबत बोलत होता.

तक्रारदार व्यक्ती तिच्यासोबत बोलत असतानाच अचानकपणे तीन अनोळखी जण आले आणि या महिलेची तू का बोलतोस ? असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महेश यांनी त्यानंतर महिलेने मला ओळख काढून मला बोलण्यास भाग पाडले याची कल्पना समोरच्या व्यक्तींना दिली मात्र तरी देखील आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्यानंतर स्कॉर्पिओमध्ये बसून नगर पुणे रोडला घेऊन जात गाडीत त्याला मारहाण करण्यात आली. सुपा इथे अखेर या तरुणाची सुटका करण्यात आली असून हा प्रकार नक्की कशावरून झाला याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा