श्रीगोंद्यात तलाठी दप्तरी नोंद न लागल्याचा फायदा घेत लावला ‘ चुना ‘

शेअर करा

नगर जिल्ह्यात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून एकदा विक्री केलेल्या जमिनीची तलाठी दप्तरी नोंद झाली नाही याचा फायदा घेत तलाठ्यालाच हाताशी धरून चक्क बोगस सातबारा उतारा तयार केला आणि त्यानंतर त्याच जमिनीची दुसऱ्यांदा विक्री केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , आबासाहेब रामदास गोटे ( राहणार शिरसगाव बोडखा तालुका श्रीगोंदा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून आरोपी याने फिर्यादी व्यक्ती यांना शिरसगाव बोडखा येथील गट क्रमांक 187/एक मधील 21 गुंठे जमीन 27 ऑगस्ट रोजी दुय्यम निबंधक कार्यालय इथे नोंद करून विकलेली होती.

दरम्यानच्या काळात आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला आणि या जमिनीची तलाठ्याच्या दप्तरी तुम्हाला नोंद करून देईल असे देखील सांगितले मात्र प्रत्यक्षात कामगार तलाठी यांनाच हाताशी धरत खरेदी विक्रीची नोंद न करता जमीन नोंदीचे बोगस कागद तयार करत पुन्हा याच क्षेत्राची सत्तावीस सप्टेंबर 2022 रोजी आणखी व्यक्तीला विक्री केली. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर अखेर आरोपीच्या विरोधात सीआरपीसी कलम 156 /तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. श्रीगोंदा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.


शेअर करा