पोलिसानेच काढली सहकारी महिला पोलिसांची छेड , शेवगावात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांनेच एका महिलेची छेड काढण्याचा प्रकार समोर आलेला असून शेवगाव येथील ही घटना आहे. पोलीस कॉन्स्टेबल असणाऱ्या एका व्यक्तीने महिला पोलिसाची छेड काढली त्यानंतर विशाखा समितीकडे तपास सोपवण्यात आला आणि संबंधित कॉन्स्टेबलच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सुनील रत्नपारखी असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून 14 सप्टेंबर रोजी त्याने महिला पोलीस कर्मचारी यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तक्रारदार पीडित पीडितेने या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडे धाव घेतली होती त्यानंतर विशाखा समितीकडे तपास सोपवण्यात आला

समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष घालत रत्नपारखी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश केलेला आहे. पोलीस पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज बोकील करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा