लोकांना मोठ्या लोकांचे खरे वाटते मात्र माझ्यासारख्यांनी.. , काय म्हणाले निलेश लंके ?

शेअर करा

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी निंबळक इथे बोलताना , ‘ नगर जिल्ह्यात काम करणाऱ्यापेक्षा गप्पा मारून लोकांना वेड्यात काढण्याचे प्रमाण जास्त आहे . जिल्हा परिषदेच्या कामाच्या प्रशासकीय मान्यता चोरून आणतात आणि स्वतःच्या नावावर खपवतात. दुसऱ्याच्या कामाचे क्रेडिट घेत नारळ फोडणाऱ्यांची टोळी जिल्ह्यात सध्या फिरत आहे . मी केलेल्या कामाचा आणि तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा कागदपत्रासहित समोरासमोर घेऊन या मग सांगतो माझ्या निधीतील कामे कोणती आणि तुम्ही केलेली कामे कोणती , ‘ असे खासदार सुजय विखे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलेले आहे.

आमदार निलेश लंके म्हणाले की , ‘ निमगाव वाघा इथे आतापर्यंत दहा कोटी रुपयांची कामे केली . आजच्या कार्यक्रमाला सर्व पुढारी एकत्र आले आहेत ही कामे कोणी केली सर्वांना माहिती आहे. सध्या कशाचाच भरोसा नाही . कधी कामे मंजूर होतात आणि कधी कट होतात याचाही भरोसा नाही आता या सरकारचा देखील भरोसा राहिलेला नाही. काही लोक फक्त कामे केल्याच्या गप्पा मारतात .

नगर जिल्ह्यात सध्या काम करणाऱ्यापेक्षा नारळ फोडणाऱ्यांची टोळी सक्रिय असून लोकांना सध्या मोठ्या लोकांचे लगेच खरे वाटते मात्र माझ्यासारख्यांनी कितीही ओरडून सांगितले तरी खरे वाटणार नाही . मी केलेल्या कामाचा आणि तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा कागदपत्रासहित समोरासमोरच घेऊन बसा माझ्या निधीतून मंजूर झालेली कामे आणि तुम्ही मंजूर केलेली तुम्ही केलेली कामे याचा हिशोबच एकदा जनतेसमोर मांडू या , असे देखील आव्हान त्यांनी सुजय विखे यांना दिलेले आहे .


शेअर करा