‘ सहज ‘ चेष्टा केल्याने आजोबा भडकले , दुसऱ्या वृद्धाचा घेतला जीव

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार यावल शहरात समोर आलेला असून धनगरवाड्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांमध्ये चेष्टा मस्करीतून वाद झाला आणि त्यानंतर मारामारी झाली त्यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा चाकूने भोसकून खून केलेला आहे . सदर हल्ल्यात हल्लेखोर व्यक्ती देखील जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , प्रभाकर आनंदा धनगर ( वय 58 ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून या प्रकरणी मुख्य संशयित असलेले रामा ढाके ( वय 61 ) हे देखील जखमी झालेले आहेत. प्रभाकर धनगर हे एका दुकानावर बसलेले असताना त्या ठिकाणी रामा आला आणि त्यांच्यामध्ये सुरुवातीला चेष्टा मस्करी सुरू झाली त्यानंतर आरोपी रामा याने संतापून अखेर त्यांच्या पोटावर धारदार चाकूने वार केला त्यानंतर धनगर यांनी देखील लोखंडी सळईने रामा याच्या डोक्यावर प्रहार केले मात्र या हल्ल्यांमध्ये प्रभाकर धनगर यांचा मृत्यू झाला . रामा डाके देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दोन्ही जणांना जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे , डॉक्टर इरफान खान यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले मात्र एकाची प्रकृती गंभीर असल्याकारणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेले होते मात्र प्रभाकर धनगर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे . आरोपी रामा ढाके याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा