अमेरिकेत ‘ द्वेषयुद्ध ‘, 71 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीकडून पॅलेस्टिनी मुलाची हत्या

शेअर करा

जगात सध्या इजराइल आणि हमास यांच्यातील युद्धाचे पडसाद अमेरिकेत देखील उमटत असून 71 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने सहा वर्षाच्या पॅलेस्टिनी मुलावर तब्बल 26 चाकूचे वार केले आणि यात मुलाचा मृत्यू झालेला आहे . द्वेषभावनेतून घडलेल्या या घटनेनंतर पॅलेस्टिनी महिला असलेली इमान निगरेट नावाच्या महिलेने मुलाच्या घराबाहेर टेडी बियर फाउंडेशन संस्था सुरू केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , वदेया अल्फाओमी असे मयत मुलाचे नाव असून इमान निगरेट यांनी टेडी बियर फाउंडेशन सुरू करून आपल्या मुलाला केवळ मुस्लिम असल्याची किंमत चुकवावी लागलेली आहे असे म्हटलेले आहे . एका निष्पाप मुलावर कोणी 26 चाकूचे वार कसे करू शकतो असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला असून मुस्लिम होता ही त्याची चूक होती का ? असे म्हटलेले आहे.

इमान यांनी पुढे म्हटले की आता तर या मुलाचं आयुष्य कुठे सुरू झालेलं होतं. आम्ही देखील मुसलमान असून मूळचे आम्ही पॅलेस्टीनी आहोत. गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकेत राहायला असून आम्हाला कधीही भीती वाटली नाही मात्र आता आम्हाला इथे सुरक्षित वाटत नाही. माझ्या लेकीने सहा वर्षांच्या वदेया आणि त्याच्या आईसाठी दोन टेडी बियर आणून ठेवलेले आहेत. निळ्या रंगाचा टेडी लहान मुलगा आहे आणि तपकिरी रंगाची टेडी त्याची आई आहे . वदेया हिची आई देखील हल्ल्यात गंभीर जखमी झालेली असून रुग्णालयात मृत्यूसोबत तिची झुंज सुरू आहे. वदेया याच्या घराबाहेर अनेक अमेरिकन नागरिक देखील टेडी बियर ठेवून त्याला आपली श्रद्धांजली व्यक्त करत आहेत.


शेअर करा