कोपरगाव हादरलं..अनैतिक संबंधातून काकाने पुतणीला संपवलं

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना कोपरगाव शहरात समोर आलेली असून काकाचे पुतणीसोबत अनैतिक संबंध असल्याकारणाने आणि त्यानंतर ही पुतणी दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याच्या संशयावरून आरोपीने तिचा खून केलेला आहे. शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी जाऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मयत विवाहित पुतणीचे वय 21 वर्ष असून ती काही महिन्यांपासून माहेरी राहण्यासाठी आलेली होती. रात्रीच्या वेळी ती घराबाहेर एका तरुणासोबत बोलत असल्याचे काकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने रागाच्या भरात तिच्यावर संशय घेत वाद घालण्यास सुरुवात केली आणि तिच्या दोन्ही पायांवर कुऱ्हाडीने वार केले त्यात ती गंभीर जखमी झाली. तिने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी तिला कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले आहे .

आरोपी कुऱ्हाड आणि मोबाईल फेकून देऊन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. प्राथमिक तपासानुसार आरोपी काकाचे त्याच्या मयत पुतणीसोबत अनैतिक संबंध होते आणि लग्नानंतर ही पुतणी माहेरी राहण्यासाठी आली. माहेरी आल्यानंतर ती एका दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याचा राग या काकाला आला त्यानंतर त्याने हा प्रकार केला. आरोपी काकाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कोपरगाव शहर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.


शेअर करा