फाल्गुनी पाठकच्या ‘ दांडिया ‘ ची डिस्काऊंट तिकिटे देतो , विशाल शाहने गंडवल

शेअर करा

नवरात्र सुरू असल्याकारणाने सध्या देशात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून यामध्ये फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या मुंबईत समोर आलेला आहे . दांडिया क्वीन म्हणून ओळख असलेली फाल्गुनी पाठक ही मुंबईला येणार असून तिच्या कार्यक्रमाची तिकीट देण्याच्या पाहण्याने तब्बल 156 जणांची एका व्यक्तीने फसवणूक केलेली असून विशाल शाह असे मुख्य आरोपीचे नाव आहे .

नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर फाल्गुनी पाठक आणि तिचा दांडिया असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. तिच्या कार्यक्रमांना गुजराती बांधव मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करतात याचाच फायदा घेत बोरिवली इथे ही फसवणूक करण्यात आलेली आहे . तिच्या कार्यक्रमाचे डिस्काउंट पास देण्याच्या पाहण्याने बोरिवली पश्चिम येथील विशाल शाह नावाच्या एका तरुणाने तिच्या कार्यक्रमाच्या तिकिटांचा आपण अधिकृत विक्रेता असल्याचा दावा केला आणि त्यानंतर कांदिवली येथील एक तरुण तिकिटासाठी त्याच्यापर्यंत पोहोचलेला होता.

आरोपी तरुणाने तिकिटाची किंमत ही 4500 आहे मात्र मी तुम्हाला हे 3300 ला तिकीट देतो असे सांगितले त्यानंतर तरुणासोबत इतरही 156 जणांनी अशी तिकिटे खरेदी करण्याची तयारी दाखवली आणि त्यांच्याकडून रक्कम आल्यानंतर विशाल शाह यांनी मोबाईल नंबर बंद करून टाकला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच हे तरुण पोलिसात पोहोचले आहेत.


शेअर करा