खळबळजनक..गिरीश महाजन को बोल दे नही तो ‘ मेरा काम कर के निकल जाऊंगा ‘ : काय आहे बातमी ?

शेअर करा

भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे साकारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा कालच मंगळवारी दुपारी पार पडला. या सोहळ्यापूर्वी अनोळखी व्यक्तीने गिरीश महाजन यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाइलवर फोन करून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर, हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली त्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. ( Former minister Girish Mahajan threatened for ransom )

उपलब्ध माहितीनुसार, गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या मोबाइलवर दुपारी साधारण एक वाजताच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्याने हिंदी भाषेमध्ये ‘गिरीश महाजन को बोल दे, एक करोड भेज दे, नही तो हम हॉस्पिटल बम्ब से उडा देंगे’. एवढे बोलून समोरच्या व्यक्तीने फोन कट केला.

त्यानंतर पुन्हा थोड्या वेळात म्हणजेच ३ वाजून ३७ मिनिटांनी तायडे यांच्या मोबाइलवर एक मेसेज केला. यात हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ‘पाँच बजे तक 1 करोड भेज दे, महाजनको बोल दे, नही तो बहोत बडा ब्लास्ट हो जायेगा, मालेगाव मे मेरे आदमी खडे हैं, नही तो तुम्हारी मर्जी, मैं मेरा काम कर के निकल जाऊंगा’, अशा आशयाचा तो मेसेज होता. या प्रकारानंतर दीपक तायडे यांनी कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना माहिती दिली त्यानंतर यासंदर्भात फिर्याद दाखल करण्यात आली.


शेअर करा