लातूरमध्ये प्राध्यापकाचे केले अपहरण , प्लस्टिकच्या पाईपने मारहाण करत..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या लातूरमध्ये समोर आलेले असून पन्नास लाख रुपयांसाठी लातूर शहरातील एका प्राध्यापकाचे चार जणांनी अपहरण करून त्यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपये काढून घेतले तसेच आणि बॉण्डवर सह्या घेऊन त्यांना कर्नाटकातील भालकी इथे सोडून दिले . प्राध्यापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिसात चार जणांच्या विरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्राध्यापक म्हणून काम करणारे सदाविजय बसवप्रकाश विश्वनाथे ( वय 32 राहणार कल्पना चौक उदगीर ) असे फिर्यादी यांचे नाव असून या प्रकरणातील आरोपी गफार इस्माईल पठाण उर्फ बबलू पठाण ( राहणार समता नगर उदगीर ), पवन बिरादार शिरोळकर , बालाजी आणि अनोळखी इसम यांनी परस्पर संगणमत केले आणि फिर्यादी यांना किडनॅप करण्याचा प्लॅन केला.

सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास शहरातील बिदर गेट येथून फिर्यादींचे अपहरण केले आणि त्यानंतर लातूर औराद शहाजानी इथे घेऊन जात त्यांना प्लास्टिकच्या पाईपने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 50 लाख रुपयांची खंडणी त्यांनी मागितली मात्र फिर्यादी यांनी आपल्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एटीएम मधून त्यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपये उकळले तसेच कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या.

सदर प्रकार जर घरच्या मंडळींना सांगितला तर तुम्हाला मारून टाकू अशी देखील आरोपींनी त्यांना धमकी दिली आणि कर्नाटकात घेऊन जात भालकी येथे सोडून दिले. चार जणांच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


शेअर करा