नगर शहरात शनिचौक ते सबजेल रोडवर पत्र्याच्या शेडमध्ये , आरोपी ताब्यात

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार सध्या समोर आलेला असून शहरांमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलेले आहे . त्याच्याकडून 6200 किमतीचा सुमारे 363 ग्राम गांजा जप्त करण्यात आलेला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , जुनेद मुजाहिद शेख ( वय 33 राहणार बेलेश्वर कॉलनी विजय लाईन अहमदनगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून शनिवारी शनिचौक ते सबजेल रोडवर पत्र्याच्या शेडमध्ये आडोशाला तो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली होती.

पोलीस निरीक्षक यादव यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या त्यानंतर आरोपीवर पथक पाळत ठेवून होते. पोलीस आपल्या पाळतीवर आहेत हे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेत 62 पुड्यामध्ये 363 ग्राम गांजा आढळून आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील , पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख , गणेश धोत्रे , योगेश भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.


शेअर करा