सासरवरून लेकीला पुन्हा वाजत गाजत आणलं , जावयाला दिला हिसका

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका वरातीची जोरदार चर्चा सुरू असून ही वरात म्हणजे मुलीला सासरी पाठवताना नव्हे तर सासरच्या जाचातून तिची सुटका करून पुन्हा आल्यानंतरची ही वरात आहे. वाजत गाजत मुलीच्या वडिलांनी तिला आपल्या घरी आणले कारण सासरी मुलीचा छळ होत असल्याकारणाने तिच्या वडिलांनी काहीही पर्याय राहिला नाही म्हणून मुलीला घरी आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला मात्र घरी आणताना देखील त्यांनी बँड बाजा आतषबाजी करत अक्षरशः वाजत गाजत आपल्या मुलीला घरी आणलेले आहे. 15 ऑक्टोबर रोजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे.

एका फेसबुक पोस्टमध्ये मुलीच्या वडिलांनी म्हटलं होतं की , ‘ मोठ्या आशेने आणि धुमधडाक्यात बाप मुलीचे लग्न लावतो मात्र पार्टनर आणि कुटुंब चुकीचे ठरले तर आपल्याला आपल्या मुलीला आदर आणि सन्मानाने घरी आणायला हवे कारण मुली खूप मौल्यवान असतात .’ मुलीच्या वडिलांचे नाव प्रेम गुप्ता असे असून रांचीतील कैलास नगर भागात ते राहतात.

28 एप्रिल 2022 रोजी त्यांची मुलगी साक्षी गुप्ता हिचे सचिन कुमार नावाच्या एका युवकासोबत लग्न झालेले होते. झारखंडच्या वीज वितरण कंपनीत तो सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असून लग्नानंतर अवघ्या काही दिवसात तिचा छळ सुरू झाला. पती मुलीला घराबाहेर काढायचा आणि प्रसंगी मारहाण देखील करायचा. लग्नानंतर एक वर्षांनी आपल्या पतीचे आधी देखील दोन लग्न झालेली आहेत ही देखील माहिती साक्षी हिला समजली मात्र तरीदेखील तिने संसार टिकवण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले. अखेर पुढील काळात पतीसोबत राहणे शक्य होणार नाही हे लक्षात आल्यानंतर साक्षी हिने आपल्या वडिलांना या प्रकाराची कल्पना दिली .

वडिलांनी देखील मध्यस्थी करून पाहिली मात्र काहीही तोडगा निघाला नाही म्हणून अखेर वडिलांनी साक्षी हिला घरी आणण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीची सासरच्या छळातून सुटका झालेली आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी बँड बाजा आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात करून तिला पुन्हा माहेरी आणण्यात आलेले आहे. नवऱ्याला घटस्फोट देण्यासाठी साक्षी हिने कोर्टात याचिका दाखल केलेली असून नवऱ्याने पोटगी द्यावी अशी तिची मागणी आहे.


शेअर करा