विवाहित असलेल्या मेहुणीपायी बायको अन मुलीचा केला खून मात्र ‘ ओव्हर ऍक्टिंग ‘ मुळे धरला : कुठे घडला प्रकार ?

  • by

पत्नी आणि मुलीचा त्याने चक्क अवैध संबंधासाठी खून केला मात्र पोलीस येताच तो मोठ्याने रडण्याचा अभिनय करू लागला. त्याचा हा अभिनय मात्र पोलिसांच्या नजरेतून काही सुटला नाही आणि आरोपीस गजाआड करून खुनाची उकल करण्यात यश आले.पतीने चक्क मेहुणीच्या प्रेमात पडल्यामुळे स्वत:च्या पत्नी व निर्दोष मुलीची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर ढसाढसा रडण्याचे नाटक करून स्वत: ला दोषी दाखविण्याचा प्रयत्न केला. अजय साहू असे यातील आरोपीचे नाव आहे. Wife and daughter murdered for sister-in-law married in an immoral relationship

उत्तर प्रदेशच्या कौशांबी येथील ही घटना आहे. पत्नीच्या मोठ्या बहिणीशी आरोपीचे प्रेमसंबंध जुळले होते. यावरून पती आणि पत्नीत वारंवार भांडण होत असे. रोजच्या भांडणाला वातागून पतीने मंगळवारी पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली.बायकोचा खून करताना ही घटना मुलीने पाहिली म्हणून त्याने मुलीचीही गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मेहुणीला दोघांनाही बेडया ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, अजय साहू असे आरोपीचे नाव असून त्याने नऊ वर्षांपूर्वी सरितासोबत प्रेमविवाह केला होता त्यानंतर दोघेही कौशांबी येथील महेवा परिसरात राहू लागले. त्यांना आठ वर्षांची मुलगी होती. त्याचदरम्यान मोहित याचे सरिताच्या मोठ्या बहिणीसोबत बोलणे होत असे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत सरिताला समजल्यानंतर तिने विरोध दर्शवला. यावरून पती-पत्नीचे वारंवार खटके उडायचे. मंगळवारी अजयने पत्नी सरिता आणि मुलीची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी घराबाहेर पडला. बाजारात त्याने खरेदी केली. त्यानंतर गंगेत स्नान केले. घरी येऊन तो रडण्याचे नाटक करू लागला. पोलिसांनी मोहितचे कॉल डिटेल्स तपासले. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अजय आणि त्याच्या मेहुणीचे फोनवर तासन् तास बोलणे व्हायचे असे पोलिसांनी कॉल डिटेल्समध्ये दिसून आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मेहुणीने अजयसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पतीला सोडून दिले होते आणि ती चार वर्षांच्या मुलीसोबत राहायची. प्रेमसंबंधांतून अजयने पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचे उघड झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.