‘ नका जाऊ ‘ म्हणून सांगितलेले ऐकले नाही आणि गाडीसकट पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता अखेर .. : व्हिडीओ

  • by

राज्यात पावसाचा जोर गेल्या २-३ दिवसांपासून कायम असून अनेक ठिकाणी पुलाच्या वरून पाणी वाहत आहेत मात्र पाण्याची ताकत कमी समजून काही लोक आपली गाडी मध्ये घालतात आणि मग पुढे पण जात येत नाही आणि मागे पण जाता येत नाही अशी परिस्थिती होते . असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यात एक माणूस चक्क वाहून गेला आहे. बारामती येथील हा व्हिडीओ असून अखेर वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेहच हाती आला. Video from Baramati driven in flood and carried away

बारामतीमध्ये 14 ऑक्टोबर रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरातील सर्व ओढ्यांना पूर आला होता. सुरक्षारक्षक विवेक महादेवराव देवधर आपली ड्युटी संपवून घरी जात होते. तेव्हा शहरातील जळोची रोडवर स्मशानभूमी नजीक ओढ्याला भला मोठा पूर आला होता. यावेळी येथे असणारे ग्रामस्थांनी विवेक देवधर यांना ‘आपण पाण्यात मोटरसायकल घालू नका. पाण्याचा प्रवाह व वेग मोठ्या प्रमाणात आहे’ अशी माहिती देऊन पुढे न जाण्यास विनंती केली मात्र देवधर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

देवधर यांनी कशाचीही पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात आपली युनिकॉन मोटरसायकल घातली. आपल्याकडे मोठी गाडी आहे, त्यामुळे आपण लगेच पुढे जाऊ असं विवेक देवधर यांना वाटले असावे.पण काही अंतर जाताच पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची गाडी जागेवरच थांबली. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, दुचाकीसह ते वाहून चालले होते. ओढ्या शेजारीच उभ्या असलेल्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन म़दतीसाठी विवेक देवधर यांच्याकडे दोरी देखील टाकली. परंतु पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने देवधर हे पाण्याबरोबर वाहून गेले. ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली मात्र ग्रामस्थ देखील हतबल होते.

दोन दिवसांनी पाण्याचा जोर ओसरला. त्यानंतर देवधर यांचा मृतदेह शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. अखेर आज सकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. देवधर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असं पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. मात्र काही ठिकाणी काही समाजकंटक लोक अशा माणूस नवीन दिसला तर त्यांना खोटी माहिती देतात आणि ते सुखरूप गेले तर मग आपण जाऊ असा देखील प्रकार करत असतात त्यामुळे कोणी काही सांगितले म्हणून ऐकण्यापेक्षा प्रवाहाशी मस्करी अंगलट येऊ शकते याचे भान ठेवण्याची गरज आहे .