बापरे ..भररस्त्यात वर्दीत असलेल्या पत्नीला नवऱ्यानं केली बेदम मारहाण : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

भाजप जेवढं महिलांच्या सक्षमिकरण आणि सुरक्षेसाठी महाराष्ट्रात आक्रमक पाहायला मिळते मात्र त्याच्याच उलट भाजपशासित राज्यांमधील महिलांवर होणाऱ्या अन्यायाकडे पाठ फिरवताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात बदायू इथे वर्दीत असलेल्या महिलेला तिच्या पतीने भररस्त्यात मारहाण केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी कठोर कारवाईसाठी पावलं उचलल्याचं दिसत नाही. केवळ आरोपी पतीविरोधात केवळ गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. A woman police officer was beaten by her husband on the road in Badaun, Uttar Pradesh

कोरोना रुग्णालयातून आपली ड्युटी संपवून जात असताना वर्दीतल्या महिलेला तिच्या पतीने गाठलं आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हे दृश्य पाहिलं मात्र त्याला रोखण्यासाठी कोणी समोर आलं नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 323 आणि 504 कलमाअंतर्गत महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला.

वर्दीत असो वा नसो पण असे रस्त्यात पत्नीला मारणे योग्य आहे का ? वर्दीचा आणि महिलेचा हा अपमान किती अमानुषपणाचा कळस आहे ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या लोकांनी देखील घरगुती विषय असेल असे समजून बघ्याची भूमिका घेतली. महिला कोरोना हॉस्पिटल एल वन सेंटर, आसरा येथील निवासस्थानातून ड्यूटी करून आलापूर पोलिस ठाण्यात परत येत होती. तिचा नवरा वाटेवर आला. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर नवऱ्यानं या वर्दीतल्या महिलेला बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


शेअर करा