‘ ब्रेकअप तर ब्रेकअप पण माझा हेडफोन दे ‘, तरुणीच्या घरी पोहचला अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब प्रकार समोर आलेला असून प्रेमात ब्रेकअप झाल्याने एका व्यक्तीने त्याच्या वर्गमैत्रिणीच्या नातेवाईकाच्या घरात घुसून चांगलाच राडा घातलेला आहे . माझे पैसे परत दे नाहीतर तुझ्या कुटुंबाला संपवेल अशी देखील धमकी त्याने दिलेली असून अमरावती येथील हे प्रकरण आहे . राजापेठ पोलिसात एका व्यक्तीच्या विरोधात 26 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , गजेंद्र गोवर्धन मोहिते ( वय वीस वर्ष राहणार अमरावती ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित तरुणी ही राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या एका नातेवाईकाकडे ती शिक्षण घेत असून आरोपी हा तिचा वर्ग मित्र आहे. त्यांच्यात ओळख असून त्याने पीडित तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली होती म्हणून तिने त्याच्यासोबत बोलणे बंद केले मात्र तिच्याकडे त्याने दिलेला हेडफोन आणि काही पैसे बाकी होते ते आरोपी परत मागत होता. 

फिर्यादी तरुणी ज्या व्यक्तीच्या घरी राहते त्यांनी या तरुणाला हेडफोन आणि पैसे परत देतो मात्र घरी येऊ नको असे सांगितले होते मात्र तरी देखील फिर्यादी हे ड्युटीवर असताना आरोपी 25 डिसेंबर रोजी आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला आणि त्याने तरुणीकडे याआधी दिलेले पैसे आणि हेडफोन परत देण्याची मागणी केली. 

फिर्यादी यांच्यावर आरोपीने तुम्ही माझ्या नावाची सुपारी दिलेली आहे असा देखील आरोप केला आणि त्यानंतर 26 डिसेंबर रोजी पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास घरी आला माझे पैसे परत द्या नाहीतर मी तुमच्या परिवाराला जीवानिशी मारून टाकेल, अशी त्याने धमकी दिली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. फिर्यादी व्यक्ती यांनी त्यानंतर राजापेठ पोलिसात या प्रकरणी तक्रार दिलेली आहे. 


शेअर करा