शंभरपेक्षा जास्त महापुरुष मग..? ,  संस्थाचालकाकडून बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान

शेअर करा

महाराष्ट्रात एक संतापजनक अशी घटना समोर आलेली असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण प्रसंगी माजलगाव तालुक्यातील राजेगाव इथे गुरुनानक पब्लिक स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डावलल्या प्रकरणी शाळेचे संस्थाचालक रामराव यशवंत माने यांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , राहुल ज्ञानोबा साळवे ( राहणार राजेगाव तालुका माजलगाव ) या पालकाने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, ‘ फिर्यादी दोन पाल्यांना घेऊन  ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शाळेत गेलेले होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजस्तंभाजवळ ठेवलेली होती मात्र संस्थाचालक रामराव माने यांनी ही प्रतिमा ऑफिसमध्ये ठेवून द्या , ‘ असे सांगितले. 

सदर प्रकरणी तिथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी रामराव माने यांना याबद्दल जाब विचारला त्यावेळी त्यांनी , ‘ शंभर पेक्षा जास्त महापुरुष आहेत सगळ्यांचेच फोटो लावायचे का ? ‘ असा प्रति प्रश्न केला त्यामुळे राजेगाव येथील ग्रामस्थ व्यक्तींच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. संस्थाचालक रामराव यशवंत माने ( तालुका परळी जिल्हा बीड )  यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 295 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे .


शेअर करा