मांत्रिक म्हणाला मयताचे आत्मे भटकू नयेत यासाठी ‘ असे ‘ करा की ? अन आत्याची नियत पालटली

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाली तरीदेखील लोकांच्या अंधश्रद्धेत काही बदल झाला नसल्याची देशात परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपळगाव डोळा येथे सहा वर्षे बालकाचा अंधश्रद्धेतून बळी देणाऱ्या आत्या, चुलता चुलतीसह सहाजणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी मयताचे आत्मे भटकू नयेत यासाठी अत्यंत अमानुषपणे या बालकाचा खून केला होता. Child victim of witchcraft in osmanabad district kalamb

उपलब्ध माहितीनुसार, पिंपळगाव येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा 26 जानेवारी 2017 रोजी शाळेतून झेंडावंदन करून घरी आला होता. घरी आई नसल्याने तो अंगणात खेळत होता मात्र त्यानंतर तो अचानक गायब झाला. तो सापडत नसल्याने कृष्णाची आई सारिका इंगोले यांनी कळंब ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची तक्रार दिली होती. पोलीस चौकशीत कृष्णाची सख्खी आत्या द्रौपदी पौळ हिने कृष्णा याला घरातून बोलावून घेतल्याचे समोर आले. त्यास तेथून दुसरा आरोपी उत्तम इंगोले याच्या घरामागील दाट झाडीत घेऊन गेले. दिवसभर झाडाला बांधून ठेवल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तेथील देवासमोर आंघोळ घालून अघोरी पूजा करून अत्यंत अमानुषपणे बळी दिला गेला.

या प्रकरणातील आरोपी द्रोपदी पौळ, उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले, साहेबराव इंगोले, सुवर्णा भाडळे, राहुल चुडावकर यांना ताब्यात घेऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारी पूर्ण होऊन प्राप्त साक्षी व पुरावे यांचा अभ्यास पूर्ण होऊन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी उत्तम इंगोले, साहेबराव इंगोले,उर्मिला इंगोले चुलता- चुलती तर द्रोपदी पौळ ही कृष्णाची आत्या आहे. हे सगळेच जण पुण्यात स्थायिक झालेले आहेत. घरात घडणाऱ्या घटनांची जोड मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेची जोडल्याने या आरोपींनी संगनमताने कृष्णाचा बळी द्यायचा हे ठरवले होते.

आरोपी उत्तम इंगोले याची चुलत बहीण व साहेबराव इंगोले याच्या पत्नीचा आत्मा भटकू नये तसेच आरोपी द्रौपदी पौळ तिच्या दोन मुली यांचे पती मयत झाले होते तर एका मुलीची लेकरे जगत नव्हती यातून सुटका होण्यासाठी मांत्रिक राहुल चुडावकर व सुवर्ण भाडळे यांच्या सल्ल्याने कृष्णाचा बळी देण्यात आला होता. नात्यातील चारही आरोपींनी पुण्यातील मांत्रिक राहुल चुडावकर, सुवर्णा भाडळे यांच्या सल्ल्याने रक्ताच्या नात्यातील बालकाचा बळी देण्याचे निश्‍चित केले. घटनेपूर्वी ते पिंपळगावात दाखल झाले. अमावस्याच्या दिवशी संधी साधून कृष्णाचा अघोरी पद्धतीने बळी घेत मयताच्या समाधीच्या ठिकाणी रक्त देखील शिंपडल्याचे उघडकीस आले होते.


शेअर करा