बायकोसोबत हवी तरच अभ्यास करेल, तेराव्या वर्षी मुलाचा निकाह करून दिला 

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून पाकिस्तानातील एक तेरा वर्षांचा मुलगा अभ्यास करण्यासाठी सोबत बायको हवी यावर अडून बसला आणि त्यानंतर बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याचा निकाह लग्न लावून देण्यात आला. दोन्हीही अल्पवयीन असल्याकारणाने या प्रकरणी संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणानंतर बालविवाहाची समस्या पाकिस्तानात मोठी असल्याचे देखील समोर आलेले आहे. 

सदर मुलाने जर मला तिच्यासोबत निकाह करण्याची परवानगी दिली तरच मी अभ्यास करेल असा हट्ट धरला आणि पालकांना त्यासाठी अल्टिमेटम देखील दिला . हतबल झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी अखेर त्याच्या प्रेमापोटी त्याला ज्या मुलीसोबत निकाह करायचा होता तिच्यासोबत निकाह करून दिला.  विशेष म्हणजे मुलीच्या घरच्यांनी देखील या निकाहास विरोध दर्शवला नाही. पाकिस्तानमध्ये पुरुषांसाठी लग्नाचे वय 18 तर मुलींसाठी लग्नाचे वय 16 वर्ष आहे. 

मुलीच्या आईचे देखील लग्न सोळाव्याच वर्षी झालेले होते असे तिने माध्यमांसमोर बोलताना सांगितले त्यामुळे आपण देखील ही परिस्थिती अनुभवलेली आहे त्यामुळेच आपण मुलीच्या लग्नाला होकार दिला असे देखील तिने सांगितले. मुलाच्या आईचे लग्न हे पंचविसाव्या वर्षी झालेले होते. त्यांच्या या विवाहावर सध्या सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 


शेअर करा