‘ ट्रिपल तलाक ‘ दिल्यावरून पती आणि सासऱ्यासह सहा जण गजाआड : कुठे घडली घटना ?

शेअर करा

अनाथ मुलीला लग्नानंतर आधार देण्याऐवजी पैशाच्या लालसेपोटी छळ करून तोंडी तिहेरी तलाक देण्यात आला. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती आणि तिच्या सासर्‍याला देखील गजाआड केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर विवाहितेचा विवाह जलाल खेड( जिल्हा नागपूर ) येथील युवकाशी मुस्लिम रितीरिवाजानुसार झाला होता परंतु मूलबाळ होत नसल्याने तसेच माहेराहून पैसे आणत नाही याचे निमित्त करत काही दिवसातच तिला मारहाण आणि शारीरिक शोषणाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ही विवाहिता पुन्हा आपल्या माहेरी परतली.

पतीसह सासरच्या मंडळींनी त्यानंतर वरुड येथे जाऊन पैशाची मागणी केली मात्र माहेरच्यांनी मागणी मान्य न केल्याने त्यांनी बेकायदेशीररित्या तिथेच तलाक देऊन ते निघून गेले. पोलिसांनी तक्रारीवरून पती साहिल शेख सईद पटेल, सईद शौकत अन्वर पटेल, शबाना सईद पटेल, सैफ सईद पटेल, हूमा साजिद पटेल खुर्शीदया सलीम शेख ( सर्व राहणार जलालखेडा ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक करण्यात आली.

दरम्यान सदर विवाहित महिलेला आई-वडील नसल्याने समाजातील एका कुटुंबाने तिचे बालपणापासून पालनपोषण केले. महिलेच्या नावाने असलेले प्लॉट विकून टाका आणि आम्हाला पैसे द्या असा तगादा सासरच्या मंडळीकडून लावला जात होता . अटकेत असलेल्या पती आणि सासऱ्याची जिल्हा कारागृहात रवानगी झालेली आहे.


शेअर करा