14 लाखांच्या व्यवहारावर तब्बल 210 कोटी रुपयांचा दंड , केवळ लोकशाहीचे थोतांड 

शेअर करा

काँग्रेसची बँक खाती सील करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत देशात प्रमुख विरोधी पक्षांवर अन्याय होत केला जात असताना ‘ न्यायपालिका , निवडणूक आयोग ही चूप बसून आहेत ही कसली लोकशाही , हे केवळ लोकशाहीचे थोतांड आहे ‘ असे म्हटलेले आहे. 

राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना , ‘ केवळ 14 लाख रुपयांच्या व्यवहारावर तब्बल 210 कोटी रुपयांचा प्राप्तिकर विभागाने दंड ठोठावला आहे असे सांगत प्राप्तिकर कायद्यामध्येच दहा हजारांपेक्षा अधिक दंड आकारता येत नाही असे असताना बेकायदेशीरपणे हा दंड लावण्यात आलेला आहे असा प्रकार म्हणजे फौजदारी गुन्हा आहे आणि हे सर्व प्रकार मोदी यांच्या निर्देशानुसार होत आहेत , ‘ असे म्हटलेले आहे. 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी बोलताना , ‘ ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांना लढण्याची समान संधी मिळण्याची गरज असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची बँक खाते गोठवण्यात आली. निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी 56% देणग्या फक्त भाजपला मिळालेल्या आहेत . भाजपला रोखीमध्ये हजारो कोटी मिळाले त्याचा काहीही हिशोब नाही . वर्तमानपत्रात सर्व जाहिराती आणि सोशल मीडिया तसेच न्यूजवर दिसणाऱ्या जाहिराती यातून हा सर्व कोट्यावधींचा पैसा भाजपलाच मिळाल्याचे स्पष्ट होत आहे ,’  असे म्हटलेले आहे . 


शेअर करा