एकतर्फी प्रेमातून नगरमध्ये केली होती प्रेयसीची हत्या..अखेर न्यायालयाने ठोठावली ‘ ही ‘ शिक्षा

शेअर करा

एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची कोयत्याने हत्या करणाऱ्या प्रियकरास नगर जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रदीप माणिक कणसे ( वय 24 राहणार तळणी तालुका रेनापुर जिल्हा लातूर ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी मंगळवारी या खटल्याचा निकाल दिला. He had killed his beloved in the ahmednagar city out of one-sided love. Finally, the court sentenced him to life imprisonment

नगर शहरातील बुरुडगाव रोडवरील जुना जकात नाका जवळ 27 मे 2016 रोजी आरोपी कणसे याने घरात घुसून मोहिनी तानाजी सूर्यवंशी ( राहणार हडगा तालुका निलंगा जिल्हा लातूर ) हिची कोयत्याने वार करून हत्या केली होती. मोहिनी हिची हत्या झाली तेव्हा ती नगर येथे नातेवाईकांकडे राहत होती. मोहिनी हिच्यासोबत लग्न करण्यासाठी आरोपी कणसे हा तिला गावाकडे तिच्या घरी जाऊन वारंवार त्रास देत होता .

घटनेच्या एक दिवस आधी कणसे हा नगर मध्ये आला होता. त्याने नगर येथील एका दुकानातून कोयता खरेदी केला त्यानंतर 27 मे रोजी कणसे हा मोहिनी राहत असलेल्या घरी गेला यावेळी मोहिनी घराच्या छतावर एकटीच होती यावेळी मोहिनी हिने आरोपी सोबत लग्न करण्यास पुन्हा नकार दिला त्यामुळे चिडून कणसे याने तिच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता

सदर घटनेची कोतवाली पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर प्रथम या गुन्ह्याचा तत्कालीन उपनिरीक्षक विनोद चव्हाण व त्यानंतर उपनिरीक्षक बजरंग बनसोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील ऍड. सतीश के पाटील यांनी काम पाहिले होते.

मोहिनी हिची हत्या झाली तेव्हा ती अल्पवयीन होती. खटल्यात आरोपी पक्षाच्या वतीने बचाव घेतला की प्रदीप कणसे व मोहिनी यांचे पूर्वीच लग्न झाले होते. कणसे याला लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी बोलावले होते मात्र मोहिनी हिची आधीच हत्या झाली होती. सरकारी पक्षाच्यावतीने पाटील यांनी हे मुद्दे खोडून काढत न्यायालयात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळी मांडली. आरोपीने कोयता कुठे घेतला ? त्याला धार कुठे लावली ? त्याची पिशवी कुठे खरेदी केली ? आणि आरोपी मुक्कामास कुठे राहिला होता याबाबत संबंधित व्यक्तींच्या साक्षी घेण्यात आल्या. ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते मात्र परिस्थितीजन्य पुरावे सक्षम राहिल्याने न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली.


शेअर करा