निमगाव वाघामध्ये शेतीच्या बांधावरून पुन्हा वाद , आरोपी घरात घुसले अन.. 

शेअर करा

नगर शहराजवळील निमगाव वाघा इथे शेतीच्या बांधावरून एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आलेला होता पुन्हा एकदा निमगाव वाघा येथे शेतीच्या बांधावरूनच वाद झाल्यानंतर चार जणांनी मायलेकाला जबरदस्त मारहाण केलेली आहे. निमगाव वाघा येथील जाधव मळा येथील ही घटना आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , चंद्रकला अंबादास जाधव ( वय 52 वर्ष राहणार निमगाव तालुका जिल्हा अहमदनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

विनोद संतोष जाधव, रवींद्र संतोष जाधव , सचिन अंकुश जाधव ( सर्वजण राहणार निमगाव वाघा ) आणि प्रवीण छबु मुळे ( राहणार भांडगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

फिर्यादी महिला या त्यांच्या मुलासोबत घरी असताना आरोपी कोयता आणि लोखंडी पाईप तसेच लाकडी दांडके घेऊन आले आणि शेतीच्या बांधावरून वाद उकरून काढत फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली. अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल इथे उपचार घेतल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींच्या विरोधात नगर तालुका पोलिसात गुन्हा नोंदवलेला आहे. 


शेअर करा