तर कुत्र्याचे नाव नरेंद्र आणि देवेंद्र ठेवू , मराठा बांधवांच्या इशाऱ्यानंतर ‘ ती ‘ पोस्ट डिलीट 

शेअर करा

भाजप नेते श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक पोस्टनंतर मराठा बांधवांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाल्यावर श्रीकांत यांनी अखेर पोस्ट डिलीट करत समस्त मराठा बांधवांची माफी मागितली आहे . आधी भावना दुखवायच्या आणि त्यानंतर माफी मागायची असा भाजप नेत्यांचा गेल्या काही दिवसांपासून अजेंडा राहिलेला असून असे प्रकार मुद्दामहून करण्यात येत आहेत का इतपत शंका यावी अशा पद्धतीने हे प्रकार घडत आहेत. 

भाजप नेते श्रीकांत भारतीय यांनी एक पाळीव कुत्रा आणलेला होता आणि त्या पाळीव कुत्र्याचे जे नाव ठेवले त्यामुळे समस्त मराठा बांधवांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी त्यानंतर श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक अकाउंटला टार्गेट करत कमेंट बॉक्समध्ये आम्ही आमच्या कुत्र्याचे नाव नरेंद्र आणि देवेंद्र असे ठेवू अशा अनेक कमेंट आणि फोटो देखील कमेंट केलेले होते त्यानंतर श्रीकांत भारतीय यांनी मराठा बांधवांची सपशेल माफी मागत अखेर ही पोस्ट डिलीट केली आहे. 

श्रीकांत भारतीय यांनी पोस्ट डिलीट करताना सपशेल माफी मागितलेली असून त्यामध्ये ‘ मी एक संवेदनशील राजकीय कार्यकर्ता आहे. गैरसमजातून सुद्धा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. त्यांची क्षमा मागतो. पण या मागची माझी पवित्र भावना समजून घ्यावी, अशी विनंती करतो.जय जिजाऊ, जय शिवराय! ‘ असे म्हटलेले आहे.


शेअर करा