लोकसभा निवडणूक गरीब जनता विरुद्ध मोजके अब्जाधीश यांच्यातील

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जयपुर इथे बोलताना पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलेला असून भाजपला देशातील गोरगरीब नागरिकांच्या प्रश्नांशी तसेच तरुणांच्या प्रश्नाशी काहीच घेणेदेणे राहिलेले नाही असे म्हटलेले आहे. 

काँग्रेसचे उमेदवार गोविंदराम मेघवान यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. बेरोजगारी आणि महागाई या देशातील मोठ्या समस्या आहेत मात्र त्याचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये दिसत नाही , असे देखील राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले की , देशातील शेतकरी किमान हमीभावाची मागणी करत असून तरुणांना रोजगार हवा आहे मात्र त्यांचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नाही. या देशात लोकशाही आणि राज्यघटना टिकणार आहे की नाही याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. 

ही निवडणूक देशातील मागासवर्गीय दलित गरीब आणि आदिवासी जनतेची निवडणूक असून सरकार सर्व बाजूंनी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाची बँक खाती देखील गोठवण्यात आलेली असून देशातील गरीब जनता विरुद्ध बावीस ते पंचवीस मोजके अब्जाधीश यांच्यातील ही लढाई आहे . देशाच्या इतिहासात प्रथमच शेतकरी कर भरत आहे , असे देखील राहुल गांधी पुढे म्हणाले . 


शेअर करा